Biography sachin pilgaonkar new marathi

सचिन पिळगांवकर

सचिन
जन्मसचिन पिळगांवकर
१७ ऑगस्ट, १९५७ (1957-08-17) (वय: ६७)
बृहन्मुंबई, महाराष्ट्र
इतर नावे सचिन,महागुरू
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि गायक.
भाषा स्वभाषा: मराठी,
अभिनय: मराठी, हिंदी
प्रमुख चित्रपट
  • हिंदी- शोले, सत्ते पे सत्ता आणि नदिया के पार.
  • मराठी- अशी ही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा, गंमत जंमत आणि आमच्यासारखे आम्हीच.
पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
वडील अरविंद
पत्नी

सुप्रिया पिळगांवकर (ल. १९८५)

अपत्येश्रीया पिळगांवकर

सचिन पिळगांवकर (१७ ऑगस्ट १९५७; बृहन्मुंबई, महाराष्ट्र - हयात) हे मराठी चित्रपट अभिनेते, निर्माते आहेत. त्यांनी मराठी, हिंदी भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी कार्यक्रम, नाटकांतून अभिनय केला आहे.[ संदर्भ हवा ]

इ.स. १९६२ सालच्या "हा माझा मार्ग एकला" या मराठी चित्रपटाद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले.[१] बालकलाकार म्हणून त्यांनी सुमारे ६५ चित्रपटांमध्ये काम केले. गीत गाता चल (1975), बालिका बधू (1976), आंखियों के झारोखों से (1978) आणि नदिया के पार (1982) हे अत्यंत यशस्वी चित्रपट करून ते अभिनेता म्हणून भारतातील घराघरात प्रसिद्ध झाले. त्यांनी हिंदी, मराठी आणि भोजपुरी सिनेमात काम केले आहे. तू तू मैं मैं (2000) आणि कडवी खट्टी मिठी यशस्वी विनोदी मालिकांमध्ये अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शन केले. त्यांनी मैं बाप (1982), नवरी मिळे नवऱ्याला (1984), अशी ही बनवा बनवी (1988), आमच्‍यासारखे आम्हीच (1990) आणि नवरा माझा नवसाचा (2004) यांसारख्या अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांचे दिग्‍दर्शन केले.[२][३]

बालपण

[संपादन]

सचिन पिळगांवकर याचा जन्म मुंबईत एका मराठी-कोकणी परिवारात झाला. इ.स. १९६२ सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटातील बाल कलाकाराच्या भूमिकेद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते बालकलाकारासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यानंतर बालकलाकार म्हणून त्याने ज्वेलथीफ, ब्रह्मचारी, मेला आणि अन्य १५ चित्रपटांतून भूमिका केल्या.[ संदर्भ हवा ]

कारकीर्द

[संपादन]

सचिन ने मराठी आणि हिंदी चित्रपटात अभिनय केला आहे. मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय, लेखन‌, दिग्दर्शन आणि काही चित्रपटात गायन केलेले आहे. त्यांनी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे अश्या मराठी चित्रपटात सृष्टीतील अभिनेत्यांना बरोबर अभिनय केला आहे. सचिन अष्टपैलू कलाकार आहे. त्यांना महागुरू ह्या आदरणीय नावाने ओळखले जाते.[ संदर्भ हवा ]

एकापेक्षा एक ह्या झी मराठी वरील नृत्य कार्यक्रमात त्यांनी परिक्षकाची भूमिका ही उत्कृष्टरित्या वठवली. तेथेच त्यांना प्रथम महागुरू असे संबोधित केले गेले.[४]

सचिन ह्यांना मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारण्याची तीव्र इच्छा होती ती इच्छा सिटी ऑफ ड्रीम्स ह्या वेबसीरिजच्या रूपाने पूर्ण झाली. ह्या वेबसीरिजचा पुढील भाग येणार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री हे महागुरू सचिन राहतील व उपमुख्यमंत्री म्हणून प्रिया बापट ह्यांना संधी दिली जाईल आणि गृहमंत्री म्हणून स्वप्निल जोशी ह्यांचे नाव विचाराधीन आहे.[५]

जीवन

[संपादन]

सचिन हे आपल्या फिटनेससाठी ओळखले जातात. दररोज ४ तास घाम गाळुन व्यायाम आणि शुद्ध सात्विक थाळीतील भोजन व भोजन्नोतर केवळ १५ मिनीटे विश्रांती हा त्यांचा फिटनेस मंत्रा आहे.[६]

स्वप्निल जोशी हा सचिन पिळगावकर ह्यांना आपले आदर्श आणि पितृतुल्य मानतो.[७]

चित्रपट

[संपादन]

मराठी चित्रपट

[संपादन]

चित्रपट साकारलेली भूमिकाप्रदर्शनाचे वर्ष (इ.स.)भाषासहभाग
कट्यार  काळजात  घुसलीमराठी अभिनय
एकुलती  एक मराठी अभिनय
शर्यत मराठी अभिनय
तिचा  बाप  त्याचा  बाप मराठी अभिनय
आम्ही सातपुते कांध्या २००८ मराठी अभिनय
नवरा माझा नवसाचाव्यकी२००५मराठीअभिनय, कथा, पटकथा लेखन, दिग्दर्शक, निर्माता
हा माझा मार्ग एकला बाल कलाकार१९६२मराठीअभिनय
अशी ही बनवा बनवीसुधीर, सुधा (नकली)१९८८मराठीअभिनय
अदला बदली २००८मराठीअभिनय
आयत्या घरात घरोबाकेदार किर्तीकर, मानकू १९९१मराठीअभिनय, दिग्दर्शक,गायन
अशी ही बनवाबनवीसुधीर, सुधा (नकली) मराठी अभिनय, दिग्दर्शक,गायक
आमच्या सारखे आम्हीचअभय , कैलाश १९९० मराठी अभिनय,दिग्दर्श,गायनन आणि लेखन.
गम्मत  जम्मत १९८७ मराठी अभिनय, दिग्दर्शक,गायक, कथा लेखक
माझा पती करोडपती१९८८ मराठी अभिनय, दिग्दर्शक, पटकथा लेखन
नवरी  मिळे  नवऱ्याला१९८४ मराठी अभिनय, दिग्दर्शक, गायक , कथा लेखक
अष्टविनायक १९७९ मराठी अभिनय

हिंदी चित्रपट

[संपादन]

चित्रपट साकारलेली भूमिका परदर्षणाचे वर्ष कार्य
शोले१९७५ अभिनय
सत्ते पे सत्तासनि
नदिया के पार
अखियोन के झरोन्कोसे
बालिका वधू (चित्रपट)
सिटी ऑफ ड्रीम्स(वेबसीरिज)[८]मुख्यमंत्री जगदिश गुरव(आमदार,विधानपरिषद)

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]